चित्रपटातील तीन गाण्यांचं ध्वनिमुद्रण पूर्ण
१४ जानेवारी १७६१ ला पानिपतमध्ये घनघोर युद्ध झाले. याच युद्धावर आधारित निर्माते अजय प्रभाकर कांबळी एक चित्रपट बनवीत असून त्याचे नाव आहे ‘पानिपत’. या चित्रपटाद्वारे जेष्ठ संगीतकार श्रीधर फडके संगीत-दिग्दर्शनात पुनरागमन करीत आहेत.

सुखविंदर सिंग यांनी डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘सांडले मराठी रक्त, राखण्या तख्त…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर श्रीधर फडके यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. श्री वेंकटेश्वरा मुव्हीज् इंटरनॅशनलची निर्मिती असलेला व अभय कांबळी दिग्दर्शित ‘पानिपत’, ज्याद्वारे संगीतकार श्रीधर फडके यांचे चित्रपट संगीतात पुनरागमन होत आहे.