अभिनेता गगन मलिक आणि अन्शू मलिक यांनी घेतले दर्शन
तथागत भगवान गौतम बुद्धांचे भावविश्व उलगडून दाखवणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ येत्या १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटातील प्रमुख कलाकार, युवराज सिद्धार्थाची भूमिका साकारणारा अभिनेता गगन मलिक आणि राणी महामाया यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्शू मलिक यांनी प्रस्तुतकर्ता नितीन गजभिये यांच्यासह बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे चैत्यभूमी येथे जाऊन दर्शन घेतले.


मूळ सिंहली भाषेतील हा चित्रपट असून श्रीलंकेत देदीप्यमान यश संपादन करताना स्थानिक भाषेतील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. त्यानंतर चीन, जपान, थायलँड, उत्तर कोरीया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि अनेक बौद्धराष्ट्रात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. युनायटेड नेशनच्या जागतिक बुद्धीस्ट फिल्म फेस्टीवल मध्ये पाच इतर पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. २०१३ या वर्षीच्या दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे हा सिनेमा महाराष्ट्रातील सिने रसिकांना तसेच तमाम बुद्धीस्ट जनतेला पाहता यावा म्हणून नितीन गजभिये व गगन मलिक यांची कल्याण मित्ता इंडरप्रायझेस ही संस्था १४ ऑक्टोबर रोजी हिंदी भाषेत महाराष्ट्रात प्रदर्शित करीत आहे.