निपूण रंगलेखनाचा अनोखा नजराणा
आर्ट निर्वाण या कला संस्थेने आयोजित केलेलं ‘सायलेंट कॉनव्हर्सेशन्स’ हे समूह कला प्रदर्शन पु. ल. देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्यमंदीर मुंबई येथे १७ सप्टेंबरपासून सुरु झाले असून ते २० सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.
शांततेचाही एक आवाज असतो, जो शब्दातीत असला तरी बरंच काही सांगून जातो. सांवद साधतो. अबोलतेपणी साधलेल्या या संवादात खुप काही समजतं. भावना, मुड, म:नस्शिती हे माणसापरत्वे बदलत जातात. एकाच घटनेला अनेक पदर असू शकतात. असा हा शांततेचा आवाज असतो. हाच धागा पकडून या प्रदर्शनात अनेक चित्रकरांनी आपल्या कलाकृती पेश केल्या आहेत.

या प्रदर्शनात अल्पना हरिश्चंद्र, अमित जळवी, अरुणा मुकुंदराज, बाबूभाई मिस्त्री, ज्योती शर्मा, मीना राघवन, मेघना उपाध्ये, प्रशांत पवार, प्रिया, प्रियाल ठक्कर, राधा पाठारे, रिद्धी आईया, रुचिरा बापट, श्वेता चतुर्वेदी, स्मिता बोरकर, सुधा मोहन, सुरेश कोंढाळकर, तपस पाल या कलाकारांनी भाग घेतला आहे.
या प्रदर्शनात तैल रंग, एक्रिलीक रंग, जल रंग, मिश्र माध्यम अशा विविध माध्यमांमध्ये कॅनव्हास आणि कागदावर रेखाटलेल्या चित्रकृती मांडण्यात येणार आहेत. अमुर्त चित्रं, अर्धमुर्त चित्रं, निसर्ग चित्र, व्यक्तीचित्र अशा अनेक प्रकारातील चित्रं या प्रदर्शनात मुंबईकर कला रसिकांना पाहता येतील. हे प्रदर्शन सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील. निपूण कलाकारांच्या कलेचा अनोखा नजराणा पाहण्याची उत्तम संधी रसिकांना या प्रदर्श्नाव्दारे लाभणार आहे.