‘तुला कळणार नाही’मध्ये हटके लूक
पोस्टरगर्ल सोनाली कुलकर्णी आणि चतुरस्त्र अभिनेता सुबोध भावे हे दोघे प्रथमच ‘तुला कळणार नाही’ या सिनेमाद्वारे एकत्र काम करीत आहे. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रत्येक नवरा-बायकोच्या नात्याचे कंगोरे पडताळून पाहणाऱ्या या सिनेमासाठी सुबोध आणि सोनालीने आपले वजन वाढवले होते.

विशेष म्हणजे, या सिनेमातील सोनालीचा लूक तिच्या चाहत्यांना अवाक करून सोडतो. कारण यात ती कमालीची वेगळी दिसत असून, तिचा ब्लंक कटदेखील लक्ष वेधून घेतो.
मुळात सोनाली म्हंटली तर, तिचे लांब काळेभोर केस आणि कमनीय बांधा डोळ्यासमोर येतो. मात्र या सिनेमात वजन वाढवण्याबरोबरच तिने तिच्या लांब केसांवर कात्रीदेखील फिरवली असल्याचे पाहायला मिळते. असे असले तरी, मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल नायिकांमध्ये गणली जाणा-या सिनेमाचे चित्रीकरण संपल्यानंतर आपले वजन पुन्हा घटवले आहे. शिवाय सुबोधनेदेखील नियोजित पथ्यपाणी करत स्वतःला पूर्ववत आणले आहे.
हा सिनेमा विवाहित दाम्पत्यांसाठी पर्वणीच ठरणार असून, मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी यात निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय श्रेया योगेश कदम, कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरन या तीकडीचा देखील या सिनेमाच्या निर्मितीत महत्वाचा हात असून, निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांनी सहनिर्मितीची धुरा सांभाळली आहे. सुबोध-सोनालीच्या या कॅमिस्ट्रीची झलक प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.