नातेसंबंधातील बदलावर मराठी सिनेमा
सिने क्षेत्रातली अनेक दिग्गज मंडळी सध्या एका वेगळ्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा आजच्या काळातला, अंतर्मुख करणारा तरी मनोरंजक असा चित्रपट ‘सोहळा’ या चित्रपटाच्या निमित्ताने साकाराला जात आहे.
प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया आणि सुरेश गुंडेचा यांच्या अरिंहत फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित मराठी चित्रपट ‘सोहळा’च्या अंतिम शेड्यूलचे चित्रिकरण नुकतेच मढ आयलैंड स्थित क्रिश विला येथे पार पडले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गजेंद्र अहिरे या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. विशेष म्हणजे सचिन पिळगांवकर आणि शिल्पा तुळसकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटांविषयी माहिती देताना सांगितले कि चित्रपटांचे कथानक हे आजच्या विभक्त छोट्या कुटुंबांच्या काळातले आहे. या चित्रपटात नातेसंबंधातील झालेला बदल आणि नात्यांमध्ये आलेलं वेगळेपण दाखविण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे. सचिन आणि शिल्पाने मुख्य भूमिका साकारली आहे तर ह्या चित्रपटांत विक्रम गोखले, लोकेशगुप्ते, मोहन जोशी व इतर कलाकारांच्या भूमिकादेखील तेवढ्याच महत्वपूर्ण आहे. हा चित्रपट एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शित करण्याचा मानस आहे.
अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी सांगितले, चित्रपटांच्या नावातच सिनेमाची कथा लपलेली आहे. नात्या-गोत्यांच्या संबंधातून रंगणारा हा एक आगळा वेगळा सोहळा आहे. जुन्या काळी सर्व कुंटुंब एकत्र राहत असे व आता ह्या आधुनिक काळात अत्यंत छोट्या कुटुंबांचे रुप प्राप्त झाले आहे. हा चित्रपट घरांतील प्रत्येक जणासाठी एक ‘सोहळा’ आहे. या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले असून संगीत दिलय नरेंद्र भिडे यांनी.
अभिनेत्री शिल्पा तुळसकरने चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपटांत माझ्या समोर सचिन पिळगांवकर आहेत, तर चित्रपटांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आहेत, या दोन दिग्गजांसोबत काम करताना आमचे ट्यूनिंग इतके जुळून आले आहे कि हा सिनेमा फारच सुरेख व उत्तम प्रकारे बनला आहे.घरातल्या प्रत्येकांसाठी हा सिनेमा नक्कीच ख-या अर्थाने एक सेलेब्रेशन म्हणजेच सोहळा आहे.चित्रिकरणाच्या शेवटच्या दिवशी अभिनेता सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळस्कर, आस्था खामकर, लोकेश गुप्ते व अन्य कलाकरांसोबत एक पार्टी सॉंग चित्रित करण्यात आले, हे गाणे सुरेख जमून आले आहे.