प्रितमसोबत सुप्रियाने केला स्क्रीन शेअर
निसर्गाची मोकळ्या हाताने उधळण, लाल मातीचे – डांबरी नागमोडी वळणाचे रस्ते, हिरव्यागार पायवाटा, निळाशार समुद्र किनारा, या धुंद वातावरणात ती आणि तिच्या विचारात हरवून गेलेला तो. सोबतीला मोहून टाकणारे सुमधुर गाणे… हे कोणत्या कादंबरीतले वर्णन नसून हे आहे ‘सोनचाफा’ या गीताचे सार…
अश्वराज मोशन पिक्चर्स रसिकांसाठी घेऊन येत आहे तरुणाईला भुरळ पाडणारं गीत ‘सोनचाफा’. या गीताचे लेखन-दिग्दर्शन ‘कट्टी बट्टी’फेम राजेंद्र पवार यांनी केले आहे. या गीतातुन पुण्याची नवतारका सुप्रिया महाडिक ‘कट्टी बट्टी’ फेम अभिनेता प्रितम भुजबळरावसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. गाण्याचे संगीत अमेरिकेतून प्रशिक्षण घेतलेले दक्षिणात्य तरुण संगीतकार कार्तिक गोपालकृष्णन याचे असून गाण्याला स्वर प्रसिद्ध पार्श्वगायक प्रवीण कुवर यांचा आहे. छायांकन सुजित कावणकर यांनी केले आहे. कोकणातील दापोली, आंजर्ले, कड्यावरचा गणपती, आसुद बाग, सुवर्णदुर्ग किल्ला अश्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रित होत आहे. या गाण्याची झलक प्रोमो स्वरूपात युट्यूबवर रिलीज झाल्यापासून पूर्ण गाणे पाहण्याची उत्सुकता रसिकांना आहे. या गाण्याची ऑडिओ झलक https://www.youtube.com/watch?v=5p_wURIuJ48 या लिंकवर ऐकू शकता.