स्टार प्रवाहच्या मालिकेत मेकओव्हर!
टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात, त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे यांचे अनुकरण केले जाते, त्याची फॅशन तयार होते. या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यानंतर सहसा त्यांचा लूक बदलत नाही. मात्र, स्टार प्रवाहने एक वेगळा प्रयोग केला असून सर्वच मालिकांच्या नायिका आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. फक्त नव्या रूपात नाही, तर त्यांचा मेकओव्हर झाला असून, या नायिका आता अधिकच ग्लॅमरस झाल्या आहेत.



विशेष म्हणजे त्याची दखल सोशल मिडियातून घेतली जात असून या नायिकांचे नवे रूप फेसबुक आणि व्हॉटसअप पोस्टमधून व्हायरल होत आहे.
या सर्व नायिकांचा मेकओव्हर का झाला, कथानकामध्ये असं काय वळण आलं, की मेकओव्हर करावा लागला, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी स्टार प्रवाहवर न चुकता पहा नकुशी, गोठ, लेक माझी लाडकी, दुहेरी आणि कुलस्वामिनी!