प्रेमाचे लग्नात रुपांतर होताना संघर्ष
स्टार प्रवाहवरच्या ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत सध्या सुरु असलेल्या एपिसोडिक कथेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्कासाहेबांच्या कोल्हापुरात सत्यजित आणि तेजस्विनीची बहरणारी ही प्रेमकथा वेगळी आहे.

विशेष म्हणजे प्रगत समजल्या जाणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातले हे अस्वस्थ करणारे वास्तव आहे, पण ते मांडताना कुठलाही फिल्मीपणा टाळून ‘पुढचे पाऊल’ या वास्तवावर एक वेगळा दृष्टीकोन मांडते. मालिका विश्वात दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अक्कासाहेबांचे हे ‘पुढचे पाऊल’ म्हणूनच वेगळे ठरते आहे. संकटातून मार्ग काढणाऱ्या, प्रश्नांची अचूक उकल करणाऱ्या अक्कासाहेब, सत्यजित आणि तेजस्विनीच्या प्रेमकहाणीत नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
अक्कासाहेबांच्या सरदेशमुख कुटुंबासोबत श्रीकांत देसाई, मयूर खांडगे, आरती मोरे, अमित खेडेकर, संदीप जुवाटकर, नीता वझे, फ्रान्सिस ऑगस्टिन या अभिनयसंपन्न कलाकारांच्या सहभागाने हा कथाभाग विशेष रंगतो आहे.