का.स वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था धुळे आणि मिळून साऱ्याजणी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३ जूनला सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत एस .एम.जोशी सभागृह पुणे येथे नवोदित कथा लेखकांसाठी रेऊ कथा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

याआधी काही वर्ष ही स्पर्धा अनुष्टुभ नियतकालिकातुन चालवली गेली. या स्पर्धेच्या निमित्तान दरवर्षी पाच उत्कृष्ट कथांना पुरस्कार दिले जातात. या कथा ‘मिळून साऱ्याजणी’मधून प्रसिद्ध केल्या जातात. या उपक्रमाचा एक
भाग म्हणून या कथा कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेत मराठीतील नामवंत कथालेखक मार्गदर्शन करणार आहेत.
नोंदणी शुल्क : २०० रु.आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
संपर्क: विद्याताई बाळ, वंदना महाजन (9920795139), गिताली.वि.म (9822746665)