कलर्स मराठीवर उत्कंठा वाढवणारी खास एन्ट्री !
कलर्स मराठीवरील ‘सख्या रे मालिके’ने टीव्हीरसिकांना गुंतवून ठेवले असतानाच आता आणखी उत्कंठा वाढवायला या मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या पात्राचं नाव आहे ‘सिद्धेश्वरी’, हे पात्र आपल्या चौफेर अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहे.

सिद्धेश्वरी म्हणजे मालिकेमधील रणविजयची काकू. बराच काळ बाहेर राहिल्यानंतर आता सिद्धेश्वरी पुन्हा जहागीरदार यांच्या वाड्यावर आली आहे. रणविजय अचानक लग्नाच्या दिवशी गायब झाला आहे आणि तो आजपर्यंत सापडलेला नाहीये. हि बातमी सिद्धेश्वरीला कळताच ती वाड्यावर येण्याचा निर्णय घेते. जहागीरदार यांच्या संपत्तीवर आणि वाड्यावर तिचा डोळा आहे.
रणविजय वाड्यावर नसण्याचा फायदा घेऊन जहागीरदारांच्या वाड्यावर सत्ता गाजविण्याच्या हेतूने ती वाड्यावर आलेली आहे. पण प्रियंवदा तिच्या या हेतूला पूर्ण होऊ देईल ? ती सिद्धेश्वरीच्या मार्गामध्ये कुठले अडथळे निर्माण करेल ? तसेच रणविजयला गायब करण्यामध्ये सिद्धेश्वरीचा तर हात नाही ना ? सिद्धेश्वरीच्या येण्याने मालिकेला कुठले नवे वळण येणार, समीर – रणविजयच्या मागचं गुपित… या आणि अश्या अनेक प्रश्नांची रंजित उत्तर मिळवण्यासाठी बघत रहा ‘सख्या रे’ हि मालिका फक्त कलर्स मराठीवर.