कलर्स मराठीवर दोन तासाचा खास भाग
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये येत्या रविवारी गुढीपाडवानिमित्त नूतन वर्षाच्या स्वागतासाठी स्पर्धक तब्बल दोन तास मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहेत. हा विशेष भाग १८ मार्चला रात्री ८ वाजल्यापासून कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.

गुढीपाडव्याच्या विशेष भागामध्ये अनिरुध्द जोशी, श्रीरंग भावे, वैशाली माडे, मधुर कुंभार, निहिरा, शरयू यांची गाणी ऐकायला मिळणार आहेत. ज्यामध्ये भारुड, जागर, पोवाडा, पार्वतीच्या बाळा, कोळी गीत, ललाटी भंडार अशी अनेक गाणी ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या भागासाठी तेजश्री प्रधान हीने खास गुढीपाडवानिमित्त जरीची साडी, गजरा, नथ अश्या मराठमोळ्या लुकमध्ये तर पुष्कराजदेखील फेटा, धोतर आणि कुर्ता अश्या मराठमोळ्या पोशाखात दिसणार आहे.