कलर्स मराठीवर १८ फेब्रुवारीपासून खास शो
‘नंबर १ यारी विथ स्वप्नील’ या हटके कार्यक्रमाचे निवेदन स्वप्नील जोशी करणार असून, दिग्दर्शन सचिन पिळगावकर करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी स्वप्नील जोशी सांगतो, “नंबर १ यारी हा पहिलाच मराठी कार्यक्रम आहे जो मैत्री या नात्यावर आधारलेला आहे. तसेच हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप खास आहे कारण सचिन पिळगावकर जे माझ्यासाठी माझ्या बाबांसारखे आहेत आणि तितकेच जवळचे मित्र पण आहेत ते हा कार्यक्रम दिग्दर्शित करणार आहे. माझ्या आयुष्यात त्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. जसा जसा कलाकार प्रसिद्ध होत जातो त्याचे खाजगी आयुष्य तो सर्वांपासून लपवत जातो. माझे खरे काम हे असेल की मी त्यांना कसे बोलकं करेन. तसेच त्यांच्या मैत्रीच महत्व त्यांच्या आयुष्यात किती आणि कसे आहे हे प्रेक्षकांपर्यंत आणणे. त्यांचे किस्से, गप्पा, मज्जा, धमाल हे सगळ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे.”
गप्पांसोबतच कार्यक्रमात कलाकारांसोबत स्वप्नील वेगवेगळे खेळसुध्दा खेळणार आहे. दोन मित्र एकमेकांना किती चांगल्या पद्धतीने ओळखतात हे आपल्याला यातून बघायला मिळेल. स्वप्नीलचा हा भन्नाट कार्यक्रम कलर्स मराठी या वाहिनीवर १८ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ६ ते ७ वाजता सुरु होणार आहे.