२ डिसेंबरला येणार सिनेरसिकांच्या भेटीला
घनिष्ट मैत्रीवर आधारित असलेला ‘फुगे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.

‘फुगे’ या अतरंगी नावामुळेच या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे.
खास करून सिनेमातील स्वप्नील आणि सुबोध मधला याराणा या सिनेमाला वेगळ्याच टप्प्यावर घेऊन जात आहे. पुण्यातील मध्यमवर्गीय आदित्य अग्निहोत्री नामक तरुणाची भूमिका स्वप्नील करताना या सिनेमात दिसेल. सुबोधचा लूक प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज पॅकेज ठरणार आहे. ‘फुगे’ सिनेमाद्वारे सुबोध ऋषिकेश देशमुख नावाच्या, आताच्या मनमौजी डेनिम घालणाऱ्या आणि स्वच्छंदी आयुष्य जगणाऱ्या युवकाच्या भूमिकेतून त्याच्या चाहत्यांसमोर येत आहे.
‘प्रेम’ केवळ प्रेमीयुगुलांचे नसते तर ते दोन मित्रांचे देखील असू शकते असेच काहीसे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. स्वप्नील-सुबोधचा हा ‘याराणा’ येत्या २ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे.