नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला
सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांसोबत नवनवीन चेहरे ही रुपेरी पडद्यावर झळकताना दिसत असतात. तेजल भालेराव हा असाच एक नवा चेहरा लवकरच ‘शुभं करोति कल्याणम्’ या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

तेजलचा हा पहिलाच सिनेमा असला तरी तिने आपल्या अभिनयाने यातील भूमिका समर्थपणे साकारली आहे. अश्विनी एकबोटे, सिया पाटील, नरेश बिडकर अशा अनुभवी कलाकारांसोबत तितक्याच तोडीचा अभिनय साकारण्याचे आव्हान तेजलने खुबीने पेलले आहे.
‘शुभं करोति कल्याणम्’ या चित्रपटातून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका मुलीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिच्या आयुष्यात एक अशी घटना घडते जी तिच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते. अशी कोणती घटना घडते? चांगल्या-वाईटाची समज देत प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध लढायला शिकवणाऱ्या ‘शुभं करोति कल्याणम्’ चित्रपटातून सुरेख संदेश दिला आहे.