चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार
इफ्फी, बंगळूरू, मुंबई, पुणे आणि कलकत्त्याबरोबरच जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांग्लादेशसारख्या ३५ हून अधिक नामांकीत चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावून २ महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण १५ पुरस्कारांवर नाव कोरलेला ‘द सायलेंस’ हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

ट्रेलर लाँच सोहळ्याला निर्मा त्या अश्विनी सिधवानी, निर्माते अर्पण भुखनवाला, नवनीत हुल्लड मोरादाबादी आणि अरूण त्यागी, सहनिर्माते गौरीश पाठारे आणि सनी ख्नन्नाबरोबरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत अंजली पाटील, नागराज मंजुळे, रघुवीर यादव यांसारखे चित्रपटातील नामवंत कलाकार आणि अॅड. पूजा कुटे उपस्थित होत्या.
अॅड. पूजा कुटे यांच्याकडे असणाऱ्या खटल्यावर चित्रपट बनवण्यासाठी कथा-पटकथा लेखन निर्मात्या अश्विनी सिधवानी यांनी केले असून, दिग्दर्शन आणि संवाद लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. संगीत इंडियन ओशन बँडने दिले आहे. छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांनी केले असून संकलन मयुर हरदास यांचे आहे. हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.