व्यस्त असूनही तितिक्षा तावडे रमते चित्रकलेत
कलर्स मराठीवरील सरस्वती मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. तितिक्षा तावडे म्हणजे तुमची लाडकी सरस्वती. तिला जरासा वेळ मिळाला कि चित्रमग्न होते.


सेटवर देखील येताना तिच्या सोबत तिचे कलर्स, चित्रकलेची वही असते, जसा वेळ मिळेल तसं मी चित्र काढते. आवड आहे म्हणजे ती वेळात वेळ काढून जोपासली पाहिजे हे तितिक्षा कटाक्षाने पाळते हे म्हणायला हरकत नाही. वॉटर कलर्स, क्रेओन्स, ब्रश अस बरच साहित्य तितिक्षाकडे आहे. तिच्या सगळ्या चित्रांमध्ये विठ्ठलाचं चित्र जवळचं आणि आवडत असल्याच ती सांगते. कारण आषाढी एकादशी निमित्त हे चित्र मी विठ्ठलासाठी काढल होत असे ती म्हणाली. माझा जन्म आषाढीचा आहे त्यामुळे खास प्रेम आहे कदाचित असे ती पुढे म्हणाली.