चित्रपट दिग्दर्शक मच्छिंद्र चाटे यांचा विश्वास
देवयानी मुव्हीजचा आगामी सिनेमा ‘तु.का.पाटील’ कानाको पऱ्यातील चित्रपटरसिकांपर्यंत पोहचणार असून, या चित्रपटातील मुख्य ‘तु.का.पाटील’ची भूमिका साकारणारा संवेदनशील अभिनेता नागेश भोसले विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक मच्छिंद्र चाटे यांनी व्यक्त केला.

‘तु.का.पाटील’ या चित्रपटाचे कथानक ग्रामीण महाराष्ट्रात घडते. या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन यावर केशव काळे यांनी काम केले आहे व योगिराज माने यांनी गीतलेखन केलेले आहे. तसेच राजेश सरकटे यांनी संगीत दिले आहे .
या चित्रपटात १७ गाणी आहेत. त्यापैकी १४ गाणी योगिराज माने यांनी लिहिली आहेत. उर्वरित ३ गीते ही मराठी पारंपारिक गीते नवीन चाली घेऊन येत आहेत.
या चित्रपटात सुरेश वाडकर, राजेश सरकटे, स्वप्नील बांदोडकर, नितीन सरकटे, आशीष नाटेकर, साधना सरगम, अमृता फडणवीस, बेला शेंडे, वैशाली देशमुख, संगीता भावसार, नेहा वैष्णव, राणी तरारे यांनी पार्श्वगायन केले आहे.
चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन कीशु पाल, समाधान सल्गर, संदेश पाटील हे करत आहेत. ‘तु.का.पाटील’ चित्रपटात कॅमेरामन राहूल जाधव, संकलन जफर सुलतान, कलादिग्दर्शन सुधीर तारकर, वेशभूषा क्रांती चाटे व सहदिग्दर्शक सुनील साळूंखे हे पाहणार आहेत.
या चित्रपटात नागेश भोसले यांच्यासह प्रिया बेर्डे, मैथिली जावकर, उपेँद्र लिमये, जितेंद्र जोशी, भार्गवी चिरमुले, सुरेखा पुणेकर, भारती नाटेकर, स्मिता शेवाळे, सिद्धेश्वर झाडबुके, संदीप पाठक, संजना नारकर, अशोक शिंदे, अमृता फडणवीस, राजेश सरकटे हे सर्व आघाडीचे कलाकार भूमिका साकारत आहेत. मनिष नाटेकर व प्रतीक्षा शिर्के हे नवोदित कलाकार प्रथमच पदार्पण करत आहेत.
‘तु.का. पाटील’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल, असा मानस दिग्दर्शक मच्छिंद्र चाटे यांनी व्यक्त केला.