एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी ४, ५ आणि ६ नोव्हेंबरला
महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धा असा नावलौकिक असलेल्या ‘उंबरठा एकांकिका स्पर्धा २०१६’ची प्राथमिक फेरी ४ नोव्हेम्बरपासून सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील रंगकर्मी सहभागी होत असून, साऱ्या नाट्यकर्मींची नजर आता ‘उंबरठा’वर खिळली आहे.
ज्येष्ठ संगीतकार स्व. श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ गेल्या १४ वर्षांपासून उत्कर्ष सेवा मंडळ ही राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा घेत आहे. यंदा या स्पर्धेत ४५ एकांकिका सहभागी झाल्या असून, प्रामुख्याने महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, जळगाव आणि गोवा येथूनही संस्था सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेत महाविद्यालयीन कलावंतांचाही मोठा सहभाग असून, त्यांच्यासोबत प्रतिष्ठित हौशी संस्थांच्या रंगानुभवाची जुगलबंदी या स्पर्धेचे खास आकर्षण ठरणार आहे.
उंबरठा २०१६ प्राथमिक फेरीच परीक्षण करण्यासाठी सिने- नाट्य अभिनेत्री विमल म्हात्रे, सिने-नाट्य दिग्दर्शक व अभिनेता सुदेश म्हशीलकर व ‘रात्रीस खेळ चाले’ फेम व नाट्यलेखक प्रल्हाद कुडतरकर हे पाहणार आहेत.
गेल्या १३ वर्षात या स्पर्धेने महाराष्ट्रातील रंगकर्मींच्या मनात हक्कचं स्थान मिळवलं, त्याचा कारण आहे दर्जेदार आयोजन, परीक्षक निवड, पारदर्शक निर्णय आणि मैत्रिपूर्ण वातावरण! त्यामुळेच नवोदित कलाकारांसाठी ‘उंबरठा’ हक्कचा रंगमंच देणारी स्पर्धा म्हणून ओळखली जातेय. उंबरठा पार करून गेलेल्या प्रत्येक कलाकाराला पुढील त्याच्या नाट्यप्रवासाचे दालन उघडतेच आणि त्याची उदाहरणे आहेत सध्याच्या मराठी वाहिनीवरील मालिकेत गाजत असलेले मयुरी देशमुख, प्रल्हाद कुडतरकर, मिहीर राजदा, अद्वैत दादरकर, प्रसाद खांडेकर, विनम्र भाबल.
यंदाच्या ‘उंबरठा २०१६’ची प्राथमिक फेरी दि ४, ५ आणि ६ नोव्हेंबरला सेकंडरी हायस्कुल, ना.म. जोशी मार्ग, डिलाईल रोड येथे होणार असून, अंतिम फेरी शनिवार दि. १७ डिसेम्बर २०१६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न होणार असल्याचे उत्कर्ष सेवा मंडळाचे कलाविभाग प्रमुख तुषार होडगे यांनी सांगितले.
आठवणींतला छायांकित जल्लोष!



