चांगला कलाकार असणं आणि चांगला माणूस असणं याचं उदाहरण नुकतंच ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’ या स्टार प्रवाहवरील मालिकेच्या सेटवर पहायला मिळालं. उपेंद्र लिमयेसारख्या सीनियर अभिनेत्याच्या हातावर गरम चहा सांडूनही त्यानं सहकलाकारांना सांभाळून घेत प्रसंग उत्तम प्रकारे चित्रीत केला.
त्याचं झालं असं, की रणजित (उपेंद्र) आणि नकुशी (प्रसिद्धी आयलवार) यांच्या सकाळच्या चहा देण्याच्या प्रसंगाचं चित्रीकरण सुरू होतं. ती चहा देताना रणजित तिचा हात पकडतो. मात्र प्रसिद्धीला हा प्रसंग साकारताना अवघडलेपण आलं होतं. कॅमेरामनला चित्रीकरणात वाफाळता चहा दिसायला हवा होता. चित्रीकरणावेळी प्रसिद्धी उपेंद्रनं दिलेल्या लुकमुळे घाबरली आणि तिच्या हातून गरम चहाचा कप सुटून उपेंद्रच्या हातावर पडला. गरम चहानं उपेंद्रचा हात भाजला. प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं. चिडचिड न करता प्रसिद्धीकडे हसून पाहिलं. जे झालं त्याचा विचार न करता प्रसंग नीट चित्रीत करण्यासाठी त्याने तिला प्रोत्साहन दिलं.