राज्य शासनाच्या वतीने प्रतिष्ठेच्या पुरस्काराची घोषणा
५ लाख रोख तसेच मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने उत्तम सिंग यांच्या नावास अनुमोदन दिले. या समितीत सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, अजय व अतुल गोगावले आणि श्रेया घोषाल यांचा समावेश आहे.
उत्तम सिंग यांनी नौशाद, मदन मोहन, सचिन देव बर्मन सी. रामचंद्र. तसेच राहुल देव बर्मन यांच्यासारख्या ज्येष्ठ सगीतकारांसोबत कामे केली. त्यांची ही कारकीर्द चालू असताना त्यांना संगीतकार जगदीश खन्ना यांची साथ लाभली. या जोडगोळीने अनेक भाषांमध्ये कामे केली. अनेक हिंदी व तामिळ चित्रपंटासाठी कामे केली. राजश्री प्रॉडक्शनचे गाजलेले चित्रपट ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ तसेच विविध तामिळ चित्रपटांसाठी आणि पंजाबी चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केले. त्यांनी मनोज कुमार यांचे पेंटरबाबू व क्लर्क या चित्रपटांनाही संगीत दिले. १९९२ साली जगदीश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वंतत्रपणे काम सुरू केले. एक संगीतकार म्हणून चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या दिल तो पागल है, दुश्मन, फर्ज, दिल दिवाना होता है या गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिले. १९९६ साली उत्तम सिंग यांनी ‘ओम साई ओम’ व २००२ साली सूर या खाजगी अल्बमला संगीत दिले. तसेच १९९७ साली त्यांना ‘दिल तो पागल है’ या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला व २००२ साली ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृप्ट संगीत दिग्दर्शक) जाहीर झाला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार २०१६चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिनवादक उत्तम सिंग यांना देण्यात येणार असल्याचे २७ सप्टेंबरला जाहीर करण्यात आले.

उत्तम सिंग यांचा जन्म २५ मे १९४८ साली झाला. त्यांचे वडील सतारवादक होते. उत्तम सिंग यांनी त्यांच्या वडिलांकडून वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासून संगीताचे धडे गिरवायला सुरूवात केली. त्यांनी सात वर्षे मटका वाद्य, ६ महिने सितार वाद्य व दोन वर्षे गायनाचे शिक्षण घेतले. उत्तम सिंग १२ वर्षांचे असतानाच त्यांचे वडील त्यांना मुंबईत घेऊन आले. वयाच्या १२ वर्षापासून त्यांनी तबला व व्हायोलिन याचे शिक्षण घेतले. उत्तम सिंग यांनी तीन वर्षे व्हायोनिलन वादनाचे काम केले. सन १९६३रोजी त्यांना मोठा बेक्र मिळाला.
