बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट
जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट ‘वजनदार‘ चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार असून या चित्रपटात प्रिया बापटने अभिनयासह पार्श्वगायनही केले आहे . विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती असलेला ‘वजनदार’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नाविन्यपूर्ण शब्द असलेलं हे गाणं ओंकार कुलकर्णी यांनी लिहलेले आहे. अविनाश-विश्वजित यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे. या सभारंभाला सई ताम्हणकर, प्रिया बापट,सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटणीस, लेखक व दिग्दर्शक सचिन कुंडलकर, निर्माती विधि कासलीवाल आणि इतर कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

या चित्रपटाचे टीजर्स, पोस्टर आणि ट्रेलरला सोशल मीडियात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मराठी इंडस्ट्रीतल्या ग्लॅमरस आणि स्टार अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट, चॉकलेटबॉय सिद्धार्थ चांदेकर यांच्यासारखे ‘वजनदार’ फॅन फॉलोईंग असलेले कलाकार या चित्रपटात आहेत. त्याशिवाय माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा सुपुत्र चिराग पाटील, चेतन चिटणीस हे नव्या दमाचे कलाकारही या चित्रपटात आहेत. त्यामुळे आशयविषयासह भरभक्कम मनोरंजन प्रेक्षकांना नक्कीच अनुभवता येईल.