दिवाळीनंतर उलगडणार बारीक होण्याच्या धडपडीचं रहस्य
वजनदार माणसांना टेन्शन असतं ते बारीक होण्याचं… जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट ‘वजनदार’ चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे.

क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पुत्र चिराग पाटील या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. उत्तम स्टारकास्ट, वेगळा विषय आणि फ्रेश लुक ही या चित्रपटाची खासियत आहे. सई आणि प्रियाच्या वजनदार भूमिकांमुळे या चित्रपटाविषयी गेलं वर्षभर इंडस्ट्रीत उत्सुकता आहे.

चापूनचोपून साडीतल्या घरंदाज लुकमधली सई आणि ‘बबली’ लुकमधली प्रिया यांच्यातली केमिस्ट्रीही मस्त जमून आली आहे. ट्रेलरमधूनच चित्रपट फ्रेश, कलरफुल दिसतो आहे. तसंच या कथानकाला संवेदनशील पदरही असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे जाड असणं-बारीक होणं याच्या पलिकडे जाऊन आयुष्याविषयीचा वेगळा दृष्टिकोन हा चित्रपट देईल, असं या ट्रेलरमधून जाणवत आहे.
‘ज्या बारीक नसतात, त्या जाडच असतात’ असं सांगणाऱ्या ट्रेलरनं सोशल मीडियात लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा ‘वजनदार’ प्रेक्षकांना नक्कीच वजनदार मनोरंजन देणार आहे.
Trailer link : https://www.youtube.com/watch? v=0YwvHUN_UeA