बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने निर्मिलेला ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी सिनेमा येत्या रविवारी झी टॅाकीजवर पहिल्यांद्याच प्रसारित केला जाणार आहे. २६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता व सांयकाळी ६ वाजता झी टॅाकीजवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येईल.
वडील व मुलाच्या नात्यातील अव्यक्त आणि हळवा कोपरा उलगडून दाखवत ‘व्हेंटिलेटर’ सिनेमा नात्यांचा हरवलेला संवादनव्याने साधू पाहतो. कोकणातील कामेरकर कुटुंबाचे प्रमुख गजू काकांना आजारपणात व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. गजू काकांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांचा उद्देश, नात्यातील गमती-जमती या चित्रपटातून मार्मिकपणे मांडत वडील आणि मुलाच्या नात्यातील गुंत्यांची कारणं आणि तो सोडवण्याचा उपाय चित्रपट सांगतो.
आशुतोष गोवारिकर, जितेंद्र जोशी, सतीश आळेकर, सुलभा आर्या, सुकन्या कुलकर्णी, निखिल रत्नपारखी, नाना जोशी,बोमन इराणी यासारख्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या ‘व्हेंटिलेटर’चा आस्वाद येत्या रविवारी २६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता व सांयकाळी ६ झी टॅाकीजवर अवश्य घ्या.