ब्रिस्बेनमध्ये मराठी रंगभूमी दिनाचे सेलिब्रेशन
येत्या ५ नोव्हेंबरला रंगभूमी दिन साजरा करायला विजय कदम यांना थेट ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाकडून खास निमंत्रण लाभलं असून प्रेक्षकांना मनमुराद हसवायला ते ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत.


ऑस्ट्रेलियात मराठी रंगभूमी दिन साजरा करण्याचा बहुमान ब्रिस्बेनच्या महाराष्ट्र मंडळाला मिळाला असून, त्यात गेली ४२ वर्षे रंगभूमीची सेवा करणारे रंगकर्मी व चतुरस्त्र अभिनेते विजय कदम यांना सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष भूषण जोशी आणि डॉ. अमोल देशमुख व इतर पदाधिकारी उत्साहाने रंगभूमीदिनाच्या तयारीला लागले आहेत.