मराठी मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
आपल्या सहजसुंदर विनोदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय कलाकार विजय कदम गुढीपाडव्याचे औचित्य साधत ‘खुमखुमी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने चेन्नईला मराठी रसिकांच्या भेटीस पोहोचले.

‘खुमखुमी’ कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी चेन्नईतील मराठी मंडळ उत्साहाने सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदार फडके, आशुतोष आपटे, चेन्नईच्या मराठी मंडळाचे अध्यक्ष समीर गद्रे यांचे बहुमोलाचे सहकार्य मिळाले. आगामी काळातही वेगळ्या उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमाचा मानस बोलून दाखवतानाच महाराष्ट्रातील कलाकार व प्रायोजकांना www.mmchennai.in येथे संपर्क साधण्याचे आवाहन चेन्नई मराठी मंडळाचे अध्यक्ष समीर गद्रे यांनी केले आहे.