संतोष कोल्हेंची नवीन वेबसिरीज
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ‘व्हायरस’ने थैमान घातला आहे. हा ‘व्हायरस’ दुसरं तिसरं काहीही नसून मनोरंजन विश्वात ‘व्हायरस मराठी’ या नावाने लवकरंच येणारं नवीन युट्युब चॅनेल आहे.
हा ‘व्हायरस’ ज्याने अपलोड केला होता ती व्यक्ती आहे दिग्दर्शक संतोष कोल्हे. एक मुखवटाधारी व्यक्ती हा
‘व्हायरस’ अपलोड करताना एका व्हिडीओ क्लिपमध्ये आपल्या समोर आली. पण हा ‘व्हायरस’ नेमका आहे तरी काय? आणि ही व्यक्ती हे सगळं का करते या प्रश्नांना उत्तरंच मिळालं नव्हतं. या प्रश्नांनी सबंध महाराष्ट्राला भंडावून सोडले होते. आज हा ‘व्हायरस’ नेमकं काय आहे याचा उलगडा झाला आहे.

या मराठमोळ्या युट्युब चॅनेलद्वारे ‘Awesome Twosome’ आणि ‘Shock कथा या दोन आगळ्यावेगळ्या वेब सिरीज संतोष कोल्हे घेऊन येत आहेत. २८ मार्चपासून युट्युबवर आपल्याला ‘व्हायरस मराठी’ या वेब चॅनेलच्या मनोरंजनाची मजा घेता येईल.
या वेब चॅनेलचे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी याआधी हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये क्योंकी सास भि कभी बहु थी, कहाणी घर घर कि, कुसुम, बंदिनी, बैरी पिया, सौभाग्यवती भवं अश्या मालिकांचे दिग्दर्शन केलं आहे, तसेच मराठीमध्ये भटकंती, सांजसावल्या, ढोलकीच्या तालावर, झुंज मराठमोळी, डिस्कव्हर महाराष्ट्र या मालिकांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. आणि आता ते ‘’व्हायरस मराठी’ या नावाने एक नवीन मराठी वेब चॅनेल जगभर पसरलेल्या तमाम मराठी लोकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत.
कसं असेल हे नवं वेब चॅनेल आणि काय घेऊन येणार आहे आपल्यासाठी नवीन हे जाणून घेण्यासाठी २८ मार्चपासून पाहायला विसरू नका ‘व्हायरस मराठी’.