आमदार संजय केळकर रामकृष्ण परमहंस यांच्या भूमिकेत
मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेह-यांपैकी एक अभिनेता विकास पाटीलला आता त्याचे चाहते एका वेगळ्याच भुमिकेत पाहणार आहे. ‘विश्वनायक’ या हिंदी महानाट्यात तो स्वामी विवेकानंद यांची भूमिका करणार आहे. ‘विश्वनायक स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारण्याची संधी मला लाभली हे माझं मोठं भाग्य आहे. आतापर्यंत अनेक भुमिका केल्या पण हिंदी रंगमंचावर इतक्या मोठ्या महामानवाची व्यक्तीरेखा लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी मोठं आव्हानात्मक आहे, पण तितकीच अभिमानाची गोष्ट देखील आहे” असे विकासने सांगितले. गंधार प्रोडक्शन निर्मित या हिंदी महानाटकाचे दिग्दर्शन प्रां मंदार टिल्लू यांचे असून शिरीष लाटकर यांचे लेखन आहे. तसेच श्रद्धा सचिन मोरे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
विशेष म्हणजे, या हिंदी नाटकात ठाणे आमदार संजय केळकर रामकृष्ण परमहंस यांच्या व्यक्तीरेखेत दिसून येणार आहेत, शिवाय सतीश आगाशे, नीलपरी खानवलकर, राजू आठवले, सुकन्या काळण, मकरंद पाध्ये हे मराठी कलाकारांचा देखील सहभाग आहे.