स्टार प्रवाहची नवी मालिका ३० ऑक्टोबरपासून
तिन्हीसांज म्हणजे दिवे लागणीची वेळ. याच वेळेत महाराष्ट्रीयन घराघरात येत्या ३० ऑक्टोबरपासून विठूमाऊली अवतरणार आहेत. विठ्ठलावर आधारित नवी मालिका ‘विठूमाऊली’ स्टार प्रवाहवर सुरू होत आहे.
सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांची कोठारे विझन या मालिकेची निर्मिती करत आहेत. या मालिकेतून लोकोध्दारासाठी अवतार घेतलेल्या विठ्ठलाची महती दाखवली जाणार आहे. तसेच विठ्ठलाचं रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याशी असलेलं नातंही उलगडणार आहे. एक आगळेवेगळे पौराणिक कथानक प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
