गायक उदय भवाळकर यांचे गायन
पंचविसाव्या मैफलीने यशस्वी सहा वर्षे साजरी करणाऱ्या स्वरयात्रातर्फे `धृपद संध्या` या मैफलीत प्रसिद्ध गायक उदय भवाळकर यांच्या सुरेल स्वराल धृपद गायकीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. ही मैफल मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून पू. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रविंद्र नाट्य मंदिर), प्रभादेवी येथे रंगणार आहे.
या मैफलीत उदयजींना पखवाजवर साथ करण्यासाठी संजय आगळे उपस्थित राहणार आहेत. धृपद या अत्यंत दुर्मिळ अशा भारतीय शास्त्रीय संगीत प्रकाराचे सादरीकरण आज काही तुरळक कलाकारच करतात. हा संगीत प्रकार अधिक प्रचलित करण्यासाठी ही मैफल आयोजित करण्यात आली आहे. हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगितातील सर्वांत जुना प्रकार असून आजही तो जीवंत आहे. झोकून देऊन केलेली गायकी, आत्मिकता, सांगीतिक आभासीत्व आणि पराक्रम या भावनांशी ही गायकी संबंधित असते. यातील शुद्ध आणि शक्तीशाली ऊर्जेत ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच स्थितीत घेऊन जाण्याची ताकद आहे. धृपद गायकी ही आत्मिक असून रसिक श्रोत्यांना मानसिक शांतता देणारी ही गायकी आहे.
धृपद या उत्तर भारतीय संगीत प्रकाराला धार्मिकतेच्या कोंदणातून बाहेर काढून आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचवण्यात उदय भवाळकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या खर्जातील आवाजामुळे या अंतर्मूख करणाऱ्या आणि चिंतन करण्यास भाग पाडणाऱ्या संगीतप्रकाराला आणखी नवीन चेतना निर्माण होतात. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या बहिणीकडून संगीतधडे गिरवण्यास सुरूवात केली असून त्यानंतर, १९७५ ते १९८१ या कालावधीत उज्जैन येथील संगीतालयात अधिकृत शिक्षण घेतले. त्यांचे नैपुण्य सहाजिक होते आणि उस्ताद अल्लाऊद्दिन खान संगीत अकादमीत शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. या संस्थेत त्यांना दागर बंधू झिया फरिदुद्दिन दागर आणि झिया मोहिउद्दिन दागर या धृपद स्तंभाप्रमाणे असलेल्या ख्यातनाम गायकांकडून शिक्षण घेता आले. त्यांनी १९८५ साली भोपाळ येथे आपली पहिलीवहिली मैफल यशस्वी केली. त्यानंतर, भवाळकरांनी संपूर्ण भारतासह बर्लिन, हॉलंड, लंडन, स्विझर्लंड, फ्रान्स आणि बेल्जियम या देशांतही मैफली गाजवल्या. त्यांनी रोटरडॅम येथील संग्रहालयात मानद प्राध्यापक म्हणून भूमिका बजावली असून अम्सटरडॅम येथील जागतिक संगीतालयातही प्राध्यापकपद भूषवले.
मनोज मंडलीकर यांनी स्थापन केलेली स्वरयात्रा ही कौतुकास्पद संस्था असून ज्येष्ठ तसेच, नवोदित गायकांच्या हजारो मैफलींचे आयोजन, त्यांचे मुद्रीकरण व साठवण या संस्थेतर्फे केली जाते. भविष्यात या संगीत खजिन्याचा फारच उपयोग होणार आहे. मनोज म्हणाले, “मैफलीसाठी प्रायोजक शोधणे हे अत्यंत कठीण आणि जिकीरीचे काम असते.“ निधी गोळा करण्यासाठी कोणतीही कल्पना नसताना त्यांनी संस्थेची स्थापना केली आणि अनेक यशस्वी मैफली उभारल्या. मैफलींसाठी त्यांच्या हितचिंतकांनी व संगीतप्रेमींनी निधी गोळा करून काही ठराविक कलाकार व ठराविक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनोज यांना मदत केली. हा सहभाग एक कलाकार व एका मैफलीपुरताच मर्यादित असतो.
स्वरयात्राचे मनोज मंडलीकर म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही स्वरयात्रेच्या माध्यमातून कलाकारांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत. ते पुढे म्हणाले की, “सभागृह सादरीकरण अर्थात निवडक रसिकांपुढे संगीत सादरीकरण कलाकार आणि रसिकांमध्ये चांगले बंध निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण ठरतात. भारतीय शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांपुढे वेगवेगळ्या कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणे आणि संगीत बैठकीच्या सादरीकरणातून जिवंत ठेवण्याची ही प्रक्रिया माझ्यासाठी खूपच समाधानकारक आहे.”
मैफलीची तिकीटे www.ticketees.com येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – ९६९९०३६९००