हार्मोनि फिटनेस स्टुडिओ तर्फे डोंबिवली तसेच ठाणे येथे ‘कम टू बी फिट वर्कशॉप’ मार्च महिन्याच्या आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी घेण्याचे योजिले आहे.
डोंबिवली, ठाण्यात ‘कम टू बी फिट वर्कशॉप’
हार्मोनि फिटनेस स्टुडिओतर्फे आयोजन
‘आजकालच्या धावपळीच्या युगात कामाचा ताण अधिक असल्याने आरोग्याकडे, फिटनेसकडे लक्ष देता येत नाही. त्याने मानसिक ताणदेखील वाढतो. परंतु दिवसभरातील काहीसा वेळ फक्त योगा करण्यात घालवला तर दिवसभरात येणारा थकवा कमी होण्यास मदत होते. म्हणून योगा करणे ही काळाची गरज बनत चालले आहे.” असे हार्मोनी फिटनेस स्टुडिओच्या प्रमुख शर्वरी जोशी हिने सांगितले.
शर्वरी जोशीने एम. एस. सी. ही पदवी योगा विषयातून घेत असून ती सर्टिफिकेट ट्रेनर म्हणून ठाणे येथे प्रसिद्ध आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या फिटनेस वर्कशॉप मध्ये पॉवर योगा, मॅट पिलाटे्स, झुंबा असे फिटनेस प्रकार घेतले जाणार आहेत. हे फिटनेस प्रकार केल्याने लठ्ठपणा कमी होणं, मधुमेहासारख्या आजारांपासून रक्षण होणं, मानसिक ताण कमी होणं या सारखे फायदे होतात. तर या आणि आपल्या फिनेस बाबत अधिक सतर्क व्हा.
डोंबिवली पश्चिम
स्थळ : भोईर जिमखाना टेरेस, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम
वेळ : संध्याकाळी ५:३० ते ६:३०
तारीख : १७ मार्च रविवार : पॉवर योगा
२४ मार्च रविवार : झुंबा
३१ मार्च रविवार : मॅट पिलाटे्स
ठाणे पश्चिम
स्थळ : डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस, घोडबंदर रोड, पवार नगर, ठाणे पश्चिम
वेळ : सकाळी ११ ते १२ तारीख :
१८ मार्च रविवार : पॉवर योगा
२५ मार्च रविवार : मॅट पिलाटे्स
०१ एप्रिल रविवार : झुंबा