योगिता होले यांच्या चित्रांचे प्रदर्शन
सुप्रसिद्ध चित्रकार योगिता होले यांच्या ‘भुतदया’ या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात २१ मे ते २७ मे २०१८ दरम्यान भरणार असून ते तेथे सर्व रसिक व कलाप्रेमींना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या कालावधीत विनामूल्य बघता येईल.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने योगिता यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून त्या म्हणतात, ‘माझी चित्रसाधना अनुभवातुन आलेली आहे. ज्या परिस्थितीतुन मी जात होते ते चित्ररुपात चित्रीत होत होते. अभिनव कला महाविदयालय पुणे मध्ये शिक्षण घेत असलांना अजंठा चित्राचा प्रभाव माझ्या चित्रांवर होता . थोपटे सरांचे मार्गदर्शन व चव्हाण सरांचा प्रिंटचा प्रभाव त्यावेळी होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर चित्रकार पति लाभल्यामुळे माझ्या विचारांवर त्यांच्याही विचारांचा व वाचनाचा प्रभाव होवु लागला. मुंबई मध्ये राहताना येथील कलाकार मित्र – मैत्रिणींचे एक नवीन विश्व निर्माण झाले . जीवनातील चढ- उतार चित्रांचे रूप बदलवत होते. त्याच वेळेची गर्भा अवस्थतेतील मी आपल्या मुलाची कल्पना ही नैसर्गिक स्त्री भावना चित्ररूपात चित्रीत होत होती. त्यावेळी देवी_ देवतांचे ग्रंथ, पुस्तके वाचन कल्पनेला चित्ररूप देत होते’
“मैत्रेया । म्हणजे येणारा देवाचा कलिकी नंतरचा. देव अवतार. ताे कदाचित माझ्या मुलाच्या रुपातच असेल आशी भावना निर्माण होत होती. त्यानुनच चित्र करत गेले. मुलाच्या जन्मानंतर मुलाचे नाव मैत्रेय ठेवले. त्या सर्व चित्रांचे प्रदर्शन ‘मैत्रेयT’ नावाने भरविले. या सर्व चित्रप्रवासाला १८ वर्ष झाली. आज मी प्राचार्य म्हणून कला विदया संकुल चनी२ोड येथे काम करते. परिस्थितीमुळे चित्रप्रदर्शन करणे शक्य झाले नाही मात्र चित्रप्रवास चालुच होता.
या सर्वामध्ये कुटुंब परिवारातील आणखी एक सदस्य महत्वाचा आहे. ‘यश’ हे एक कासव आहे. मात्र गेली ८ वर्ष ते कुटुंबातिल एक सदस्य म्हणुन दिवसरात्र माझ्या मागे पुढे लहान मुलासारखे बागडत असते. कधी त्याचा राग तर कधी प्रेम अनुभवायला मिळते .त्याचे आस्तित्व हळु हळु चित्रात उमटु लागले . माझे प्राणी मात्रावर प्रेम वाढु लागले. सासु वारकरी संप्रदायातील असल्यामुळे त्या कल्पनेतुन ‘वारी’ हे चित्र कासवाच्या सातत्य व शांतता या रुपातुुन सुचले, भारतीय संस्कृतीमध्ये गायीला गोमाता तर ‘कामधेनु ‘ ही ईच्छापूर्ती करणारी गाय माझ्या चित्रात येणे साहजिकच आहे.
भारतीय संस्कृती प्रमाणेच भारतीय राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांची तिन माकडे आपल्याला एक संदेश देतात तसेच आजच्या व्यावहारिक जगात मोबाईलचा समावेश झाला आहे. चौथ्या माकडाद्वारे मोबाईल मधुन वाईट बघु नका, वाईट बोलु नका, वाईट ऐकु नका हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय संस्कृती व महान नेत्याबरोबरच आपल्या अवतीभवती विक्षिप्त स्वभावाचे माणसेही असतात. त्यांच्या प्राण्याच्या स्वभावाशी साररवेपणा दिसतो. जसे मांजर डोळे बंद करते. तिला वाटते जगानेही डोळे बद केले आहे. तसेच वाघाचे कातडे घातलेत्या शेळीचा रुबाब तिच्यातील अज्ञानाचे प्रतिक दाखवते. या सर्वाबरोबरच आनंद देणारे व आनंद वाटणारे ही माणसे जगात असतात. मयुरी मोर हे आपल्या सौंदर्याने नव्हे तर त्याच्चा मृत्याने आनंद देतात . दोन विरुद्ध स्वभावाचेसुध्दा प्रेम करू शकतात. सहवास त्यांना प्रेम करण्यास भाग पाडतो. जसे आपण पाहतो मांजर कुत्रा. सिंह. शेळी’ ऐकमेकांवर माया दाखवतात. ज्याप्रमाणे पक्षीणीचे कुटुंब आपत्या पंखाखाली पिल्लाना वाढावित असते तसेच आपण आपल्या मायेने सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा हाच संदेश मला ‘भुतदया’ या चित्र प्रदर्शनातुन मांडण्याचा प्रयत्न आहे.