समीर आशा पाटील करणार दिग्दर्शन
‘चुकीला माफी नाही’ म्हणत ‘दगडी चाळ’ या चित्रपटानं यश मिळवल्यानंतर शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटचे अमोल ज्ञानेश्वर काळे ‘यंटम’ या हटके चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘चौर्य’ या चित्रपटातून लक्ष वेधून घेणारे समीर आशा पाटील ‘यंटम’ दिग्दर्शित करत आहेत.

‘यंटम’ या चित्रपटात संगीत हा या चित्रपटाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. ‘यंटम हा बोलीभाषेतला शब्द आहे. ग्रामीण भागात हा शब्द प्रचलित आहे. हा माझा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. आताच या चित्रपटाविषयी सर्व सांगणं योग्य ठरणार नाही. वेळोवेळी सर्व तपशील जाहीर केले जातील. मात्र, या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच वेगळं काहीतरी पहायला मिळेल,’ असं दिग्दर्शक समीर आशा पाटीलनं सांगितलं.
‘दगडी चाळ’ या माझ्या अँक्शनपटानंतर खरंतर मी एका वेगळ्या कथानकाच्या शोधात होतो. त्यावेळी माझी भेट समीरशी झाली आणि त्याने मला ‘यंटम’ची कथा ऐकवली त्याचवेळी मला ती भावली आणि मी लगेच होकार दिला. आता नेमकं ‘यंटम’ म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले.