स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा चित्रपट
प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेल्या ‘वायझेड’ हा चित्रपट रविवारी, ११ डिसेंबर रोजी दुपारी १ आणि रात्री ८.३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर दाखवला जाणार आहे.
‘वायझेड’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर का पहावा याची ही पाच कारणं…

वायझेड म्हणजे वाईट शब्द नाही. वायझेड आहे एक अटिट्यूड. हा अटिट्यूड तुम्हाला वायझेडचा स्टार प्रवाहवरील वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहिल्याशिवाय कळणार नाही.
लेखक-दिग्दर्शक जोडी स्वतःतल्या छोट्या, निरागस व्हर्जनला बाहेर काढून मनमोकळं जगण्याचा संदेश देणारे लेखक दिग्दर्शक खरेखुरे ‘वायझेड’ आहेत. टाइमप्लीज, डबलसीट अशा उत्तम चित्रपटातून त्यांनी आपल्या लेखक-दिग्दर्शनाची चुणूक दाखवलीच आहे. मात्र, वायझेडमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं धमाल केली आहे. खुसखुशीत लेखन आणि त्याची तितकीच धमाल मांडणी या चित्रपटात आहे.

संस्कृत गाणं आणि संगीत ‘YZ’ या चित्रपटानं प्रेक्षकांना खूप सरप्राईज दिली. संस्कृत भाषा आता जास्त कुणी बोलताना दिसत नाही आणि असे असताना देखील संस्कृत गाण्याची निवड करणे हे म्हणजे कठीण पाऊलय आताच्या युवा प्रेक्षकांनाही आवडेल असं ‘प्रियकरा’ संस्कृत गाणं या चित्रपटाची खासियत आहे. त्याशिवाय ओ काका या धुमशान गाण्यानं प्रेक्षकांना ताल धरायला लावला. त्याशिवाय निरामय, अरे कृष्णा अरे कान्हा, मीचि मज व्यालो अशी उत्तमोत्तम गाणी या चित्रपटात आहेत. खऱ्या अर्थानं व्हर्सटाइल असा म्युझिक अल्बम वायझेड चित्रपटानं दिला. हृषिकेश-सौरभ-जसराज यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत.
स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा वायझेड आपण सावळे आहोत, आपण बुटके आहोत, आपल्याला ड्रेसिंग सेन्स नाही असे काही ना काही न्यूनगंड मुला-मुलींच्या मनात असतात. काहीवेळा ग्रामीण भागातून शहरात आल्यावर हा न्यूनगंड वाढतो. वायझेड पाहिल्यावर मनात कुठलाही न्यूनगंड राहणार नाही याची १०० टक्के खात्री देतो. कारण, वायझेड तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवेल.