झी मालिकेतील कलावंत रंगले ढोलताशांच्या गजरात
मुंबईतील गिरगावमध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येेतो. ढोल ताशांच्या गजरात, रांगोळ्याच्या रंगरंगोटीने सजलेली आणि पारंपरिक वेशभूषेने नटलेली शोभायात्रा तर या उत्सवाची शान असते. या सोहळ्यात मराठी परीवार मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. याच सोहळ्यात काल सहभाग घेतला झी मराठीच्या कलाकारांनी.
काहे दिया परदेस मालिकेतील शिव (ऋषी सक्सेना) – गौरी (सायली संजीव) आणि नकटीच्या लग्नाला यायचं हं मालिकेमधील नूपुर (प्राजक्ता माळी) या कलाकारांनी या शोभायात्रेत हजेरी तर लावलीच शिवाय ढोल वाजवत त्या नादात रंगूनही गेले. याच उत्सवाचे काही क्षण टिपलेत छायाचित्रकार प्रसाद नाईक यांनी.