प्रिमिअरची वरात थेट तुमच्या घरात
मराठी मनाचे मराठी सिनेमावरील प्रेम लक्षात घेत झी टॅाकीजने ‘प्रिमिअरची वरात थेट तुमच्या घरात’ आणली आहे. रविवार ६ नोव्हेंबर दुपारी १२ वा. व सायं ६ वा. झी टॅाकीज व झी टॅाकीज एचडीवर प्रेक्षकांना ‘बाजी’ या चित्रपटाचा आस्वाद घेता येईल.
एका गावातल्या सर्वसामान्यांची आणि त्यांच्या तारणहाराची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात सच्च्या मनाचा, सगळ्यांना मदत करणाऱ्या एका तरुणाची कथा मांडली आहे. अनेक अडचणींना तोंड देणाऱ्या या तरुणाची प्रेमकथा कशी रंगते? त्याला कोणाशी संघर्ष करवा लागतो? याची कथा म्हणजे ‘बाजी’.
या चित्रपटात श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, इला भाटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फॅण्टसी, रोमान्स आणि अॅक्शन याची मेजवानी असलेला बाजी हा चित्रपट रविवार ६ नोव्हेंबर दुपारी १२ वा. व सायं ६ वा. झी टॅाकीज व झी टॅाकीज एचडीवर अवश्य पहा.