तरुणाईबरोबर लुटली मजा
केळकर कॉलेजच्या डायमेन्शन या कॉलेज फेस्टिवलमध्ये झी युवाच्या फ्रेशर्स, युवा गिरी आणि लव लग्न लोचा या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली. कॉलेजच्या तरुणाईबरोबर त्यांनी या फेस्टिव्हलची मजाही लुटली.

विद्यार्थाना अभ्यासाव्यतिरक आकर्षण असतं ते म्हणजे त्यांच्या फेस्टिवलचं. फेस्टिवल म्हंटल कि विद्यार्थ्यांच्या जीव कि प्राण. आणि त्यात मग वेगवेगळ्या स्पर्धा आणि बरंच काही. झी युवाच्या फ्रेशर्स मालिकेतील रेणुका, मनवा आणि सम्राट, लव्ह लग्न लोचा मालिकेतील शाल्मली आणि अभिमान तर युवागिरीमधील अपूर्व रांजणकर आणि स्नेहा चव्हाण या सर्वानी या फेस्टमध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. ग्राऊंडवर स्पर्धांमध्ये स्पर्धक होऊन आणि ऑडीटोरीयममध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘झी युवा’च्या प्रवासाबद्दलसुद्धा सांगितले. झी युवाच्या कलाकारांना या फेस्टमुळे स्वतःच्या कॉलेजचे डे आठवले.