झी युवावरील ‘इथेच टाका तंबू’त रंगणार प्रेम ‘कहाणी’
प्रेम कधी कोणावर आणि कसं होईल याची कधीच शाश्वती नसते; पण ते जेव्हा होत तेव्हा त्या व्यक्तीशिवाय इतर काहीही सुचत नाही. असंच काहीस कपिल आणि गौरीचं झालेल…

रोमँटिक असं रामाश्रय कपिलने सजवलंय. लाल रंगाचे हार्ट फुगे, कॅण्डल लाईट्स… सॉफ्ट म्युझिक… लाल रंगीत पडदे… गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं रामाश्रय आणि साथीला रामाश्रयची सर्व मंडळी. आणि हो मुहूर्त आहे गौरीचा वाढदिवस.
कपिल मधुराला प्रपोझ करतोय… जसं एका मुलीला हवं असते तस्स… गुढग्यावर बसून… गौरीच्या डोळ्यात डोळे घालून… प्रेमाने तिचा हात हातात घेऊन… आणि आता सगळ्याचे लक्ष आहे गौरीच्या उत्तराकडे…
तुम्हालाही हे प्रेमाचे क्षण अनुभवायचे असतील तर पाहत राहा ‘इथेच टाका तंबू’ झी युवावर रोज रात्री ९ वाजता.