प्रक्षेपण १ जानेवारीला
पुण्यातील शनिवारवाड्याच्या प्रांगणात; झी युवावरील कलाकार आणि मराठी इंडस्ट्रीच्या तारे तारकांनी ‘झी युवा’चा पहिला ग्रँड कार्यक्रम ‘युवोत्सव’ गुरुवारी १५ डिसेंबरला सादर झाला. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी युवावर १ जानेवारीला दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता होणार आहे.

विशाखा सुभेदार, शशिकांत केरकर, हेमांगी कवी आणि कृतिका देव या विनोदाच्या चौकडीने स्किटचा स्टेज गाजवलाच पण त्यांच्या बरोबर झी युवाच्या मालिकांमधील शशांक केतकर, मधुरा कुलकर्णी, मिताली मयेकर, शुभंकर तावडे, रसिका वेंगुर्लेकर, ओंकार राऊत, विवेक सांगळे, सक्षम कुलकर्णी, ओमकार गोवर्धन, सिद्धी कारखानीस, केतकी पालव, अपूर्व रांजणेकर, स्नेहा चव्हाण या सर्व कलाकारांनी केलेल्या जबरदस्त सादरीकरनाने प्रेक्षकही त्यांच्या प्रेमात पडले.
वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, मानसी नाईक, ऋतुजा शिंदे, सुमेधा मुदगलकर, मृण्मयी गोडबोले या मराठी स्टार्सचा डान्सधमाका असा काही रंगला कि पुणेकरांनी अख्खा शनिवार वाडा डोक्यावर घेतला.
यामध्ये लोककलेचा बाज असलेल्या गोंधळनृत्यासह सैनिकांच्या वेशभूषेतील ‘मल्हारी, पिंगा फेटा हा हटके फॅशन शो आणि रँप वॉक, झोकून देणाऱ्या प्रेमात वेडं करणारे झिंगाट साँग, लावणीचं फ्यूजन, मेलडी साँग आणि डान्स शो टिपेला पोहोचवणारा ढोलताशाचा गजर आणि जोडीला मायकल जॅक्सन असे धमाल स्किट यामधून ‘युवोत्सव’ पाहण्याचा रंग क्षणोक्षणी चढत गेला आणि त्यावर पुणेकर मनापासून थिरकलेही. या सर्व धमाल मस्तीबरोबरच विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळीच शान आणली.
अभिनेता आणि लेखक प्रियदर्शन, स्टँड कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेला शशिकांत केरकर यांनी लोकांना पोट दुखेपर्यंत हसवले. छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचा तरूणाईचा चेहरा अमेय वाघ आणि सर्वांची लाडकी स्पृहा जोशी या दोघांनीही उत्कृष्ट असे सूत्रसंचालन करत झी युवाच्या युवोत्सवाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि मोस्ट रोमँटिक असा अभिनेता स्वप्नील जोशी आणि तरुणाईची आजची धकधक गर्ल प्राथर्ना बेहेरे यांच्या लाजवाब परफॉर्मन्सने या ‘झी युवा’च्या ‘युवोत्सव’ या नवंवर्षाच्या आगमनाच्या कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे झी युवावर १ जानेवारीला दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रक्षेपण होईल.