एक्सायटिंग अपडेट्स फेसबुक पेजवर
अंजनेय साठे एंटरटेनमेंट निर्मित ‘जिंदगी विराट’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, ते बघून जगण्याचा उत्सव साजरा करणारा हा चित्रपट असेल याची शास्वती देणारे आहे.
‘जगण्याची बाप गोष्ट’ ही टॅगलाईन, पोस्टरभर पसरलेल्या ‘बर्थडे कॅप्स’ आणि ‘जिंदगी विराट’सारखे हटके नाव यावरून ही एक धमाल एंटरटेनिंग फिल्म असल्याची खात्री पटते.
दिग्दर्शक सुमित संघमित्र यांचा हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरमुळे चित्रपटाच्या विषयाबद्दल उत्सुकता ताणली जात आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, चित्रपटाबद्दलचे अधिकाधिक एक्सायटिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी फेसबुक पेजला नक्की भेट द्या.