आर्टीस्ट सेंटर आणि हिंदुस्थान पेट्रोलियम लि. यांच्या संयुक्त विद्यमाने `स्वच्छ भारत अभियान’ हे चित्रप्रदर्शन मुंबईत २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील काळा घोडा येथील आर्टिस्ट सेंटर गॅलरीत भरणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन चित्ररसिकांसाठी खुले असणार आहे.
आर्टिस्ट सेंटर आणि हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे डिसेंबरमध्ये आयोजित केलेल्या `व्हिंटर आर्ट कॅम्प’ दरम्यान विविध कलाकारांनी साकार केलेल्या चित्रकृती या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. दिवंगत चित्रकार चिरू चक्रवर्ती यांच्या विरार येथील बंगल्यात हा कॅम्प घेण्यात आला होता. चित्रकारीतेच्या विद्यार्थ्यांना ख्यातनाम चित्रकारांचे मार्गदर्शन या शिबिरात लाभले होते. ज्येष्ठ चित्रकार आशुतोष आपटे, नरेंद्र पावसकर, प्रा. पौल कोहली, प्रा. विवेक दास, मधुसूदन कुमार, राजश्री करकेरा आपटे, आनंद प्रभूदेसाई, सरेखा शेट्टी, प्रमिला सालियन, मृदुला सिंह, रणजित सिंह कुर्मी आणि अरबिंदो या कलाकारांनी उभरत्या कलाकारांना अमूल्य मार्गदर्शन केले. निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या वातावरणात या कलाकारांच्या संगतीत साकार झालेल्या कलाकृती सदर प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनात आशुतोष आपटे, मधुसूदन कुमार, मृदुला सिंह, प्रमिला सलियन, रणजित कुर्मी, ओमकार पवार, महादेव जाधव, सागर ठनके, अक्षय पाटील, दामिनी शर्मा, चिराग पांचाळ, अनिरुद्ध लेले, शीतल भोतमांगे, अशोक कानडे, अशोक महाजन, केशव कासार, आशिष ठाकूर, सुरेखा शेट्टे, करण शेट्टे, वैभव निर्मळ, समीर बोर्डे, देविका ठाकूर, श्रीकांत विश्वकर्मा, श्रीकुमार स्वामी, अमोल सुतार, भास्कर गायकवाड आणि राजश्री आपटे या कलाकारांची चित्रे या प्रदर्शनात असणार आहेत.