‘राजश्री मराठी’वर ‘डान्स विथ फुलवा’
सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका (कोरिओग्राफर) फुलवा खामकर डान्स प्रशिक्षण सुरु करणार आहे, परंतु हे प्रशिक्षण नेहमीसारखं मर्यादित वेळेपुरतं किंवा एखाद्या नेमक्या जागेवर भरणार नाही. या प्रशिक्षणामध्ये कितीही लोकं सहभागी होऊ शकतात, कोणत्याही वेळी आणि कुठल्याही ठिकाणी कारण हे प्रशिक्षण असेल इंटरनेटवर.

या प्रशिक्षणाबाबत फुलवा सांगते की, ‘नृत्यप्रकार ऑनलाइन शिकवणे हा प्रयोग मराठीत पहिल्यांदाच होत आहे. क्लासमध्ये विद्यार्थ्याना शिकवणे आणि Virtually शिकवणे या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असला, तरी देखील मी क्लासेसमध्ये जसं साध्या-सोप्या पद्धतीने शिकवते अगदी तसेच इथे शिकवण्याचा प्रयत्न केलाय. मराठी चित्रपटातल्या गाण्यांवर भारतीय आणि पाश्चिमात्य नृत्यप्रकार कसे करता येतील हे मी या शोमध्ये दाखवणार आहे.’
या शो चा म्हणजेचं ‘डान्स विथ फुलवा’चा पहिला एपिसोड शुक्रवार दिनांक १७ मार्च २०१७ रोजी राजश्री मराठी (www.youtube.com/ rajshrimarathi) या यूट्यूब चॅनलवर पहायला मिळेल. त्यानंतर दर शुक्रवारी ‘डान्स विथ फुलवा’चे एक-एक एपिसोड राजश्री मराठीवर पहायला मिळतील. ज्यात फुलवा खामकर मराठी चित्रपटांच्या लोकप्रिय गाण्यांवर कथ्थक ते कंटेपररीपर्यंतचे नृत्यप्रकार शिकवणार आहे.
महिला दिनी पहिली झलक
