तब्बल १० वर्षांनी पुन्हा मोठा पडदा गाजवणार
सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी… या जोडीने गेली कित्येक वर्ष रसिकमनांवर अधिराज्य गाजवलं… पडद्यावर यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. आपल्या वैयक्तिक आयुष्यात सचिन पिळगांवकरांची जागा खास असून ते आपल्याला वडिलांच्या स्थानी असल्याचं म्हणणारा स्वप्नील जोशी तर स्वप्नीलला मुलासारखं वागवणारे सचिन पिळगांवकर… पितापुत्राचे भावबंध खऱ्या अर्थी जपणारी ही जोडी आता पडद्यावर हे नातं साकारण्यास सज्ज झाली आहे.

हा चित्रपट कोणता? या चित्रपटाची कथा काय? पितापुत्राची ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्त्यात असली तरी या जोडीला पडद्यावर एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल, यात शंका नाही.