कलर्स मराठीवर १५ ऑगस्टला प्रभात रहांगदळे
स्वतंत्रदिनी (१५ ऑगस्ट) अग्नीशामक दलाचे चीफ फायर ऑफीसर प्रभात रहांगदळे कलर्स मराठीवर त्यांच्या खास रेसिपी शेयर करणार आहेत. यासोबतच एलपीजीमुळे होणारे मोठे अपघात आणि धोके टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी हे देखील दुपारी १.३० ते २.३० दरम्यान होणा-या खास शोमध्ये सांगणार आहेत.
या एक तासाच्या विशेष भागात ते प्रेक्षकांना अशा धोक्यांपासून सावध राहून स्वतःची आणि इतरांची मदत करण्यासाठी रहांगदळे आवाहन करणार आहेत.कार्यक्रमाची सूत्रधार गिरीजा ओक-गोडबोले हिच्यासोबत गप्पा मारताना रहांगदळे किचन सेफ्टीबद्दल काही मोलाचे सल्ले देणार आहेत.