कबड्डीच्या बॅकड्रॉपवर रेखाटणार आयुष्यातील चढ-उतार
विशाखा मिडिया वर्क्स निर्मित व निकी बत्रा दिग्दर्शित वलय या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच पद्मश्री गुरु अफसार खान यांची विशेष उपस्थिती होती.
‘तुझ्या प्रेमात मन हे माझे आज गुंतले’ हे प्रेमगीत गायक स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरबद्ध केलं असून याच गीतलेखन व संगीत प्रकाश प्रभाकर याचं आहे. हे प्रेमगीत प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल असा विश्वास गायक स्वप्नील बांदोडकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
आयुष्यातील चढ-उतार प्रत्येकाला काहीतरी शिकवून जात असतो. याच चढ-उताराचा वेध कबड्डी खेळाच्या माध्यमातून वलय चित्रपटातून घेण्यात आला आहे.
अशोक कुंदनानी निर्मित या चित्रपटात अजिंक्य देव, रेशम टिपणीस, सुरेखा कुडची, अभिलाषा पाटील, आरती सपकाळ, अमिषा आंबेकर, वैभव आमटे, सायरा खान, रितू नचणी, नीरज अंबुले, फहीम खान, अनिकेत मोगरे, विनायक पुजारी, रक्षित देशमुख या कलाकारांच्या भूमिका आहेत.