विवेक कजारिया दिग्दर्शित ‘दुर्गा’ लघुपटाची मोठी भरारी
मराठीतील विद्या बालन म्हणून ओळखली जाणा-या वीणा जामकरने ‘दुर्गा’ या लघुपटात एका बंगाली स्त्रीची भूमिका साकारली आहे. विवेक कजारिया दिग्दर्शित हा लघुपट कोरियात झालेल्या बुसान इंटरनॅॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला आहे.
मराठी सिनेमांचा झेंडा सातासमुद्रापार पोहोचल्याने जगाच्या पाठीवर मराठी सिनेमाची आणि कलाकारांची मान नक्कीच उंचावली आहे. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकरदेखील जगभरातील सिनेमात काम करत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री वीणा जामकर.
‘या लघुपटाचा विषय मुलीच्या जन्माशी संबंधित आहे. एका घरात मुलीचा जन्म होणं किती महत्वाचं आहे यावर आधारित हा लघुपट आहे. कथेची पार्श्वभूमी बंगाली संस्कृतीचं दर्शन घडवून आणणारी आहे. त्यामुळे हा लघुपट करताना मला खूप मजा आली. विवेक स्वतः पहिल्यांदा दिग्दर्शनात पदार्पण करत असल्याने आमच्या दोघांचा अनुभव खूप चांगला होता.” असे वीणाने सांगितले.