‘रेश्मा’ची हटके स्टाईल
दिल दोस्ती दुनियादारी फेम सखी गोखले म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी रेश्माचा ऑन स्क्रीन सिंपल लूक प्रेक्षकांना खूपच भावला. सखीनेही तिचे टिपिकल पंजाबी ड्रेस, साड्या संपूर्ण लूक खूप छानप्रकारे कॅरी केला आहे. ही झाली ऑन स्क्रीन दिसणाऱ्या रेशमाची आवड पण खऱ्या आयुष्यात सखीला साड्यांची भारी हौस आहे.
गोंडस चेहरा आणि भोळसट स्वभाव असलेली, दिल दोस्ती दुनियादारी फेम सखी गोखले म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी रेश्मा हिने तिच्या अप्रतिम अभिनय कौशल्याने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. दिल दोस्ती दुनियादारीच्या निमित्ताने सखी महाराष्ट्रातील घरा घरात पोहोचली आणि सर्वांची लाडकी रेश्मा म्हणून त्यांच्यातलीच एक झाली.
सखीला साड्यांचं इतक वेड आहे की तीच कपड्यांचं कपाट अर्ध साड्यांनीच भरलेलं आहे. सखी कडे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचे कलेक्शन आहे एवढच नव्हे तर तिला जसा फावला वेळ मिळतो त्या वेळात साडी नेसायची प्रॅक्टिस करायची संधी ती कधीच सोडत नाही.
साडी नेसून मिरवण तर सखीला इतकं आवडत की तिने नवरात्रीमध्ये देखील नऊ दिवस त्या त्या रंगाच्या साड्या नेसून सोशल मिडियावर तिच्या फॅन्ससाठी फोटोस अपलोड केले. तिच्या फॅन फॉलोविंगलादेखील सखीची स्टाईल खूपच आवडते आहे. सखी ही दुस-या फॅशन ट्रेंड्स फॉलो करण्यापेक्षा स्वतःची हटके स्टाईल स्टेटमेंट बनवणाऱ्या मताची आहे.