गज्वी, गणोरकर,तांबे यांच्यासह ३२ वाङ्मयकारांच्या कलाकृतींचा सन्मान
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले असून, वेगवेगळ्या साहित्य प्रकारच्या वाङ्मयनिर्मितीसाठी लेखकांचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये डॉ. प्रभा गणोरकर, प्रेमानंद गज्वी, संजीवनी खेर, राजीव तांबे, प्रतिमा इंगोले, सुहास बहुळकर, प्रकाश बाळ जोशी, हेरंब कुलकर्णी आदी मान्यवर वाङ्मयकारांचा समावेश आहे.
वाङ्मयकार आणि त्यांच्या पुरस्कारप्राप्त कलाकृती
प्रभा गणोरकर : व्यामोह (काव्यसंग्रह)
इग्नेशिअस डायस : अधांतराला लटकलेल्या अवतरणात (काव्यसंग्रह)
रमेश नाईक : ती एक अहिल्या होती : नाटक / एकांकिका
बा.भो.शास्त्री : झांजर (कादंबरी)
नितीन थोरात : सूर्याची सावली (कादंबरी)
प्रकाश बाळ जोशी : प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा (लघुकथा)
ऋषिकेश वांगीकर : कथास्तु (लघुकथा)
प्रेमानंद गज्वी : सगुण नगुण (ललित गद्य)
संदेश कुलकर्णी : मााँटुकल दिवस (ललित गद्य)
प्रतिमा इंगोले : हॅट्रिक (विनोद)
सुहास बहुळकर : आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर (चरित्र)
डॉ. उज्ज्वला सहाणे : प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स… (आत्मचरित्र)
सुधीर रसाळ : मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण (समीक्षा/वाङ्मय संशोधन)
राजेंद्र सलालकर : रंगनाथ पठारे यांच्या साहित्यातील स्त्री-दर्शन (समीक्षा सौंदर्यशास्त्र)
रमेश पतंगे : सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (राज्यशास्त्र- समाजशास्त्र)
संजीवनी खेर :सर्वसाक्षी (इतिहास)
रामदास भटकळ, मृदुला जोशी : पॉप्युलर रीतिपुस्तक (भाषाशास्त्र/व्याकरण)
रमेश नारायण वरखेडे : सायबर-संस्कृती (विज्ञान तंत्रज्ञान)
डॉ. नितीन मार्कण्डेय : सातत्यपूर्ण आणि भरपूर दुधासाठी माज संकलन तंत्र (शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय)
डॉ. श्रीराम पेडगावकर : मानवी अर्थशास्त्र (अर्थशास्त्र)
दिलीप धोंगडे : तात्पर्य (तत्वज्ञान व मानसशास्त्र)
हेरंब कुलकर्णी : जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कुल्स (शिक्षणशास्त्र)
बी. के. कुलकर्णी : पर्यावरण (पर्यावरण)
द. दि. पुंडे : शताब्दी आवृत्ती गावगाडा (संपादित)
अश्विनी भिडे-देशपांडे : मादाम क्युरी (अनुवादित)
डॉ. गिरीश जाखोटिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एकविसावे शतक (संकीर्ण)
ज्ञानदा आसोलकर : पाऊस माझा साथीदार (बालवाङ्मय कविता)
डॉ. भारती सुदामे : खजिन्याची विहीर (बालवाङ्मय कादंबरी)
डॉ.सुमन नवलकर : वजनदार (बालवाङ्मय कथा)
राजीव तांबे : गम्मत शाळा भाग ३ (बालवाङ्मय छंद व शास्त्रे)
मधुकर धर्मापुरीकर : ‘अनकॉमन मॅन’ आर. के. लक्ष्मण (बालवाङ्मय संकीर्ण)
डॉ. माणिक बेंगरी : भतृणहरी ते अव्वैय्यार – सारे एकाच तत्त्वाचे धनी (बृहन्महाराष्ट्र पुरस्कार)