मेमध्ये येणार रसिकांच्या भेटीला
जी मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट तसेच एआर क्रिएशन प्रस्तुत आणि श्री सिद्धिविनायक प्रसन्न क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या ‘मेड इन महाराष्ट्र’ या चित्रपटाचा संगीतप्रकाशन सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. या सिनेमाला पाच गाण्यांचा साजशृंगार आहे.
याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते रणजीत यादव, सहनिर्माते बिपीन पाणीग्रही, राजू जाधव, रमेश तापकिरे, दिग्दर्शक नितेश पवार, जंगली म्युझिकच्या शीखाजी प्रीति तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार भाऊ कदम, अरूण नलावडे, जीतू गोस्कामी, प्रविण गर्जे, प्रिया गमरे, शितल गायकवाड, कॅमेरामन हेमंत साळवे, गीतकार दिपक अंगेवार, संगीतकार विलास गुरव यांच्यासह इतर कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
‘मेड इन महाराष्ट्र’ या चित्रपटात एकूण ५ गाणी असून यात प्रेमगीत, आयटम गीत, पोवाडा आणि प्रार्थना अशा विविध गीतांचा समावेश आहे. ‘माज्या अंतरीच्या…‘‘हे प्रेमगीत सचिन मालप यांनी लिहिले असून सचिन मालप आणि वैशाली माडे यांच्या सुमधुर आवाजात संगीतकार सुभाष-सचिन यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘होते मन बावरे…’’ हे प्रेमगीत दिपक अंगेवार यांच्या लेखणीतून आकाराला आले असून स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या आवाजात अरूण-विलास या संगीतकार जोडीने या गीताला संगीत दिले आहे.
सचिन मालप यांनी लिहिलेले ‘दिल तेरा दे दे मला…’’ हे आयटम गीत नेहा राजपाल यांनी गायले असून सुभाष-सचिन यांनी संगीतब केले आहे. ‘मना मना अंधाराच्या तुज्या कृपेची ज्योत मिळावी…’’ ही प्रार्थना गीतकार दिपक अंगेवार यांनी लिहिली असून गायक ऋषिकेश रानडे याच्या आवाजात अरूण-विलास यांनी संगीतब केली आहे. सचिन मालप यांनी लिहिलेला ‘मेड इन महाराष्ट्र…’’ हा पोवाडा संगीतकार सुभाष-सचिन या संगीतकार जोडीने संगीतब केला असून अभिजित कोसंबी याने आपल्या भारदास्त आवाजात तो सुरेख गायला आहे.
या चित्रपटात अरूण नलावडे, जितू गोस्वामी, प्रविण गर्जे, प्रिया गमरे, शितल गायकवाड आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अजय मालपे यांची संकल्पना असलेल्या या चित्रपटाची कथा-पटकथा नितेश पवार यांची असून नितेश पवार, हेमंत साळवे आणि दिपक अंगेवार यांनी याचे संवाद लिहिले आहेत. कॅमे-याची जबाबदारी हेमंत साळवे यांनी सांभाळली असून सुंदर पाटोरी आणि अश्विन सावंत यांनी संकलन केले आहे. तथागत घोष यांनी डीआय केले असून अतुल मचंर्डे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी चोख बजावली आहे. येत्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.