‘कोड मंत्र’ व्दितीय, ‘अमर फोटो स्टुडिओ’ तृतीय
राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या २९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘मग्नतळयाकाठी’ सर्वोत्कृष्ट ठरले.
अंतिम फेरीत जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या ‘मग्नतळयाकाठी’ या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली.
अनामिका आणि रसिका प्रॉडक्शन्स, मुंबई या संस्थेच्या ‘कोड मंत्र’ या नाटकास रु. ४ लाख ५० हजाराचे व्दितीय पारितोषिक आणि सुबक, मुंबई या संस्थेच्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकास रु. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
दि. २ ते ६ मे २०१७ या कालावधीत पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आशालता वाबगांवकर, श्रीनिवास भणगे, चंद्रकांत मेहेंदळे, अजित सातभाई आणि सुनिल देवळेकर यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
वैयक्तिक पुरस्कार
दिग्दर्शन
प्रथम : (रु.१,५०,०००) चंद्रकांत कुलकर्णी (मग्न तळयाकाठी)
व्दितीय : (रु.१,००,०००) राजेश जोशी (कोड मंत्र)
तृतीय (रु.५०,०००/-) निपुण धर्माधिकारी (अमर फोटो स्टुडिओ)
नाट्यलेखन :
प्रथम : (रु.१,००,०००) मनस्विनी लता रविंद्र (अमर फोटो स्टुडिओ)
व्दितीय : (रु. ६०,०००) महेश एलकुंचवार (मग्न तळयाकाठी)
तृतीय : (रु.४०,०००) विजय निकम (कोड मंत्र)
प्रकाश योजना
प्रथम (रु.४०,०००) रवि रसिक (मग्न तळयाकाठी)
व्दितीय : (रु.३०,०००) भोतेश व्यास (कोडमंत्र)
तृतीय : (रु.२०,०००) योगेश केळकर (किमयागार)
नेपथ्य
प्रथम : (रु.४०,०००) प्रसाद वालावलकर (कोडमंत्र)
व्दितीय : (रु.३०,०००) प्रदीप मुळये (मग्नतळयाकाठी)
तृतीय : (रु.२०,०००) प्रदीप मुळये (अमरफोटो स्टुडिओ)
संगीत दिग्दर्शन
प्रथम : (रु.४०,०००) आनंद मोडक व राहुलरानडे (मग्न तळयाकाठी)
व्दितीय : (रु.३०,०००) सचिन जिगर (कोड मंत्र)
तृतीय : (रु.२०,०००) राहुल रानडे (बंध-मुक्त)
वेशभूषा
प्रथम : (रु.४०,०००) प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव (मग्न तळयाकाठी)
व्दितीय : (रु.३०,०००) कल्याणी कुलकर्णी-गुगले (अमर फोटो स्टुडिओ)
तृतीय : (रु.२०,०००) अजय खत्री (कोड मंत्र)
रंगभूषा :
प्रथम : (रु.४०,०००) अभय मोहिते (अमर फोटोस्टुडिओ)
व्दितीय : (रु.३०,०००) शरद सावंत (मग्न तळयाकाठी)
तृतीय : (रु.२०,०००) संतोष पेडणेकर व हेमंत कदम (कोड मंत्र)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व प्रत्येकी रु. ५०,०००
पुरुष कलाकार :
चिन्मय मांडलेकर (मग्न तळयाकाठी),
अमेय वाघ (अमर फोटो स्टुडिओ),
वैभव मांगले (मग्न तळयाकाठी),
सुव्रत जोशी (अमर फोटो स्टुडिओ),
प्रशांत दामले (साखर खाल्लेला माणूस)
स्त्री कलाकार :
मुक्ता बर्वे (कोड मंत्र),
निवेदिता सराफ (मग्न तळयाकाठी),
लिना भागवत (के दिल अभी भरा नही),
हेमांगी कवी (ती फुलराणी),
इला भाटे (नाटक-यु टर्न-२)