नाटय़पुरस्कारांच्या नामांकनामुळे सोहळ्याला येणार ग्लॅमर!
चंदू डेग्वेकर, आशा काळे यांना नाटय़ परिषदेचा ‘जीवनगौरव’
‘अखिल भारतीय मराठी नाटय परिषदे’ने यंदाच्या ‘जीवनगौरव पुरस्कारा’साठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते चंदू डेग्वेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांची निवड केली असून, हा सोहळा १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणार आहे.
नाटय़ परिषदेने रंगकार्मिंना देण्यात येणा-या पुरस्कारांसाठी पहिल्यांदाच नामांकने जाहीर केल्याने या सोहळ्याला ग्लॅमर येणार असून, सर्वोत्कृष्ट नाटकासाठी ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘सेल्फी’मध्ये स्पर्धा लागली आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद ही मराठी रंगभूमीवरील सर्व घटकांची मातृसंस्था आहे. या रंगभूमीवरील सर्व प्रवाहांचा समावेश मानाच्या गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिन सोहळ्यात व्हावा याचा विचार करून नाटय़ परिषदेने मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील पुरस्कारांसाठी यावर्षीपासून प्रथमच नामांकने जाहीर केली असून, पुरस्कार विजेत्याचे नाव १४ जून २०१६ रोजी संपन्न होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात जाहीर होणार आहेत. संपूर्ण कार्यक्रम हा रसिकांसाठी विनामूल्य असेल, असे नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी कळवले आहे.
जाहीर पुरस्कार

‘अखिल भारतीय मराठी नाटय परिषदे’ने एकूण रंगभूमीच्या सर्वागाचा विचार करून पुरस्कारांची घोषणा केली आहे. सर्वाेत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी बंडा जाशी, नाटय़ परिषद कार्यकर्ता पुरस्कारासाठी कृष्णा जाधव, नाटय समीक्षक पुरस्कारासाठी राज काझी, सर्वाेत्कृष्ट प्रायोगिक संस्था ‘रंगगंध, चाळीसगाव’, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी देवदत्त पाठक यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतिवर्षी ‘अखिल भारतीय मराठी नाटय परिषद’ रंगकर्मींना पारितोषिके देऊन गौरविते. जीवनगौरव पुरस्कार हा प्रत्येकी रोख एकावन्न हजार रुपये, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह अशा स्वरुपात आहे. नाटय़ परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी सुनील परमार, निवेदक पुरस्कारासाठी प्रकाश एदलाबादकर, गुणी रंगमंच कामगार पुरस्कारासाठी कै. आनंद मोघे, रंगभूमी व्यतिरिक्त इतर क्षेत्रत भरीव काम करणा-या रंगकर्मी पुरस्कारासाठी सशांत घोडके यांची निवड करण्यात आली आहे. प्रकाश साळवे यांना लोककलावंत म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्याला रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत उपस्थित राहणार आहेत.
नामांकने
सर्वाेत्कृष्ट लेखक (व्यावसायिक नाटक) : हिमाशू स्मार्त परफेक्ट मिसमॅच), रत्नाकर मतकरी (इंदिरा), शिल्पा नवलकर (सेल्फी).
सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शक : क्षितीज पटवर्धन (दोन स्पेशल), विजय केंकरे (हा शेखर खोसला कोण आहे), अजित भुरे (सेल्फी).
सर्वाेत्कृष्ट व्यावसायिक नाटक : ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘सेल्फी’
सर्वाेत्कृष्ट अभिनेता : जितेंद्र जोशी (दोन स्पेशल), उमेश कामत (डोन्ट वरी बी हॅपी), किरण माने (परफेक्ट मिसमॅच).
सर्वाेत्कृष्ट विनोदी अभिनेता : सिद्धार्थ जाधव (गेला उडत), समीर चौगुले (श्री बाई समर्थ), आशीष पवार (आलाय मोठा शहाणा).
सर्वाेत्कृष्ट अभिनेत्री : गिरीजा ओक (दोन स्पेशल), अमृता सुभाष (परफेक्ट मिसमॅच), मुधरा वेलणकर (हा शेखर खोसला कोण आहे).
सर्वाेत्कृष्ट नेपथ्यकार : प्रदीप मुळये (दोन स्पेशल), संदेष बेंद्रे (तिन्ही सांज), प्रदीप मुळये (सेल्फी).
सर्वाेत्कृष्ट प्रकाशयोजना : शीतल तळपदे (हा शेखर खोसला कोण आहे), राजन ताम्हाणो (तिन्ही सांज), प्रदीप मुळये (दोन स्पेशल).
सर्वाेत्कृष्ट पाश्र्वसंगीत : राहुल रानडे (हा शेखर खोसला कोण आहे), परिक्षित भातखंडे (तिन्ही सांज), साई-पीयूष (गेला उडत).
सर्वाेत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : रोहित हळदीकर (दोन स्पेशल), डॉ. निखिल राजेशिर्के (स्ट्रॉबेरी), प्रदीप वेलणकर (सोबतीने चालताना).
सर्वाेत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : अपूर्वा नेमळेकर-देशपांडे (आलाय मोठा शहाणा), निर्मिती सावंत (श्री बाई समर्थ), केतकी चितळे (कुछ मिठा हो जाय).
सर्वाेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : ऋजुता देशमुख (नाटक – सेल्फी), शर्वरी लोहकरे (हा शेखर खोसला कोण आहे), माधवी जुवेकर (स्पिरीट).
सर्वाेत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक : ‘संगीत संशय कल्लोळ’ आणि ‘संगीत बावन खणी’
असा रंगणार १४ जूनचा सोहळा
यावर्षीचा गो.ब. देवल स्मृतीदिन मंगळवार, दि. १४ जून २०१६ आणि रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नोव्हेंबर २०१६ (पहिला आठवडा) अशा दोन सत्रांत करण्यात येणार आहे. १४ जूनला दु. ४ वा. संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असून, त्यानंतर अण्णासाहेब किर्लाेस्कर, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणोश गडकरी या नाटककारांच्या नाटकांतील नांदींचा वैशिष्यपूर्ण कार्यक्रम ‘संगीत नाटकाचं लेणं – नांदी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायं. ५ वा. पुरस्कार वितरण सोहळा आणि अंशुमन विचारे, विषाखा सुभेदार, योगेश शिरसाट, प्राजक्ता हनमघर, समिर चौगुले, भक्ती रत्नपारखी यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
रात्री ८.३० वा. नाटककार गोंविल बल्लाळ देवल यांच्या शताब्दी पुण्यतीथीला आदरांजली म्हणून ५५ व्या संगीत राज्य नाटय स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते कै. गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत नाटक ‘संगीत शारदा’चा प्रयोग होणार आहे.